मनोगत

      





         आदरणीय पालक व विदयार्थी मित्रांनो,
                 
         जसे की आपणास अवगत आहे सध्या COVID19 च्या संसर्गामुळे शैक्षणिक संस्थाना शासनाने अवकाश घोषित केला आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या शेवटी निकाल जाहीर करण्यात येतो.परंतु यावर्षी विदयार्थ्याना त्यांचा निकाल वेळेत देता आला नाही. करीता या संकेतस्थळाच्या माध्यमातून विदयार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.लवकरच आपल्याला मुळ गुणपत्रिकादेखील दिल्या जातील.
         विदयार्थी मित्रांनो तुम्ही सगळे पुढिल वर्गाच्या प्रवेशासाठी पात्र झालेले आहात करीता आपले अभिनंदन.पुढिल शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू करायचे यावर शासनस्तरावर विचार सुरू आहे.दरम्यानच्या काळात विविध माध्यमांद्वारे अभ्यास आपल्याला करायचा आहे.याआधीच सर्व वर्गाचे गट तयार करून वर्गशिक्षक व संबंधित विषयशिक्षक हे तुम्हाला मार्गदर्शन करीत आहेत.या संकेतस्थळाच्या माध्यमातूनदेखील आपणाशी संवाद साधला जाणार आहे.विविध संकेतस्थळे जसे ई बालभारती,दिक्षा ॲप, दुरदर्शन यांच्या लिंक आपणास याठीकाणी मिळतील.पुढिल शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रकिया अर्ज आपणास या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.तरी सर्व आदरणीय पालकांना विनंती करण्यात येते की आपण या सुविधेचा वापर करावा.अडचण असल्यास आपण केव्हाही संपर्क साधु शकता.

            येणा-या शैक्षणिक वर्षाकरीता आपणा सर्वांचे सस्नेह सहकार्य अधिक वृधिंगत व्हावे ही अपेक्षा…